प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘तारक मेहता’ सज्ज ! ‘या’ दिवशी प्रसारीत होणार पहिला एपिसोड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तारक मेहता का उल्ट चश्मा मालिकेच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. अलीकडेच या शोची शुटींग सुरू झाली होती. लवकरच ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे. अलीकडेच शोचे चीफ डायरेक्टर मालव राजदानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत शुटींग सुरू झाल्याची माहिती दिली होती. तेव्हाच चाहत्यांमध्ये मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता लवकरच मालिका पाहण्यासाठी प्रसारण सुरू केलं जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या या आवडत्या मालिकेच्या प्रतिक्षेत होते. या नवा एपिसोड कधी प्रसारीत होईल असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. आता शोच्या मेकर्सनं सोशल मीडियावरून नव्या एपिसोडची तारीख जाहीर केली आहे.

येत्या 22 जुलै रोजी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका पुन्हा सरू होणार आहे. चाहते आता पुन्हा मालिका पाहू शकत असल्यानं त्यांची प्रतिक्षा संपणार आहे.

शोबद्दल बोलायचं झालं तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. हा शो 11 वर्षांहून अधिक काळापासून लोकांना हसवण्याचं काम करत आहे.