‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संतापली ‘तारक मेहता…’ मधील ‘सोनू’ निधी भानुशाली ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेत पूर्वी सोनूची भूमिका साकारणारी अ‍ॅक्ट्रेस निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. निधीच्या हॉट अवतारानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निधीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. निधीनं बोल्ड बिकिनी घातली आहे. काळ्या आणि निळ्या रंगाच्या बिकिनीत निधी खूपच अ‍ॅक्ट्रॅक्टीव्ह आणि हॉट दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही लिहिलं आहे. चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड अवतार खूप आवडला आहे. हे त्यांच्या प्रतिसादावरून दिसत आहे. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. निधीचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले आहेत.

परंतु बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र निधीनं संताप व्यक्त केला आहे. बिकिनी फोटो व्हायरल झाल्यानं ती नाराज झाली आहे. तिच्या दृष्टीनं हे ठिक नाहीये.

एका मुलाखतीत बोलताना निधी म्हणाली, लोक तिच्या बिकिनी फोटोत रस घेत आहेत हे पाहून ती हैराण झाली आहे. ती म्हणते, हे माझं आयुष्य आहे. मी माझ्या आयुष्यात जे करते सर्व शेअर करत असते. सर्वच असं करतात. मला नव्हतं माहित की हे सर्व ट्रेंड करेल.

पुढं बोलताना ती म्हणते, ही खूप मजेदार बाब आहे. यावेळी एखाद्या मोठ्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु लोकांना माझ्या बिकिनी फोटोंबद्दल बोलायचं आहे.

निधीनं तिचे बिकिनी फोटो ट्रेंड झाल्याचं तिच्या दोस्तांनांही सांगितलं. हे ऐकल्यानंतर तिचे दोस्तही हैराण झाले होते.

निधीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेत तिनं आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांची मुलगी सोनू हिची भूमिका साकारली होती.