Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप?; मालिकेतील कलाकाराने दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | छोट्या पडद्यावरील सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडीचा आहे. यातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे.14 वर्षापासून यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. या शोमधील दयाबेन, जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून आले आहे. तर काही कलाकारांनी शोला राम राम देखील ठोकला आहे. तर नुकताच मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी देखील हा शो सोडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता ही मालिका बंद होणार का? अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. याबद्दलच दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी प्रिया अहुजा ने एका मुलाखतीत आपले मत मांडले आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

 

प्रिया अहुजाने देखील या शोमध्ये रिटा रिपोर्टरची मजेशीर अशी भूमिका साकारली होती. परंतु काही वर्षांपूर्वीच प्रिया या मालिकेतून बाहेर पडली होती. तर तिच्यानंतर आता पती आणि दिग्दर्शक मालव राजदाने देखील शो सोडल्यामुळे शो बंद होणार का? शोचा टीआरपी खाली आला का? असे एक ना अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या. त्यावर प्रियाने एका मुलाखतीत असहमती दर्शवत म्हटले मला नाही वाटत शोच्या टीआरपी मध्ये कोणताही बदल होईल. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

यावेळी प्रिया म्हणाली, “शोच्या कॉलिटी मध्ये कोणताही बदल होणार नाही.
मला टीआरपी ही कन्सेप्टच अजून देखील समजले नाही. कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो.
त्यामुळे त्यांना तो तशा पद्धतीने वाटत असतो. माझ्या मते हा शो आधीप्रमाणे चालत राहील.
शो लवकरच बंद होईल असे मला अजिबात वाटत नाही”.
सध्या प्रिया अहुजाच्या या खुलासाने या शोच्या प्रेक्षकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

 

14 वर्षापासून सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या या शोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
विनोदी कन्सेप्टमुळे हा शो प्रत्येकाच्याच आवडीचा शो ठरत होता.
या शोचे चाहते वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र गेल्या काही वर्षात दिशा वकानी, शैलेश लोढा,
भव्य गांधी, निधी अग्रवाल, राज अनदकत अशा अनेक कलाकारांनी शो सोडत सर्वांना चकित केले होते.

 

Web Title :- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | taarak mehta ka ooltah chashma off air soon read priya ahujas answer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक