Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | अभिनेता दिलीप जोशी यांच्या जीवाला धोका; नागपूर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या अनेक वर्षापासून छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून दिलीप जोशी हे घराघरात पोहोचले आहेत. त्यांनी आजवर प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरासमोर 25 लोक हातात शस्त्र आणि बॉम्ब घेऊन फिरत असल्याची माहिती नागपूर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन द्वारे दिली होती. यावेळी पोलिसांनी या फोनची दखल घेत जोशी यांना सतर्क राहण्यास सांगितले होते. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

 

अद्याप तरी दिलीप जोशी यांच्या जीवाला धोका कोण पोहोचवू इच्छित आहे याबाबत शोध लागलेला नाही. १ फेब्रुवारीला नागपूर पोलीस कंट्रोल रूमला या अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. यावेळी त्या व्यक्तीने सांगितले की दिलीप जोशी यांच्या घराशेजारील शिवाजी पार्क येथे 25 लोक जमलेले आहेत आणि त्यांच्या हातात शस्त्रे बॉम्ब आहेत. दिलीप जोशी व्यतिरिक्त आणखीन काही कलाकारांबद्दल हे लोक बोलताना देखील त्या अज्ञात व्यक्तीने ऐकले होते. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी हे देखील त्यांच्या टार्गेटवर असल्याने त्यांची घरे बॉम्बने उडवणार आहेत अशी माहिती त्या अज्ञात व्यक्तीने दिली होती.

ही संपूर्ण माहिती मिळताच पोलिसांनी सिक्युरिटी टाइट करत या सर्व कलाकारांना सतर्क राहायला सांगितले.
तर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ देखील करण्यात आली आहे.
नागपूर कंट्रोल रूम पोलिसांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अलर्ट देखील दिला होता.
त्याचबरोबर एफआयआर देखील दाखल करण्यास सांगण्यात आले. यानंतर ज्या नंबर वरून नागपूर कंट्रोल रूमला कॉल करण्यात आला होता त्याचा तपास केला असता तो मुलगा दिल्लीच्या एका सिमकार्ड कंपनीत काम करतो याची माहिती मिळाली.
मात्र या व्यक्तीला या घटनेची कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.
या मुलाच्या नंबरचा वापर करून त्याची फसवणूक करून एका अँप द्वारे कॉल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
तर पोलिस आता त्या कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | taarak mehta ka ooltah chashmah actor dilip joshi house nagpur police received a call 25 men guns roaming outside

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले