Republic Day 2021 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार राम मंदिराची प्रतीकृती, राजपथावर गरजणार राफेल लढाऊ विमान

नवी दिल्ली : यावेळी प्राजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अयोध्याचा चित्ररथसुद्धा दिसणार आहे. ज्यामध्ये राम मंदिराचे मॉडल दर्शवण्यात येईल. संरक्षण मंत्रालय वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांना लवकरच मंजूरी देईल. सूत्रांनुसार, उत्तर प्रदेशातून अयोध्याच्या चित्ररथाचा प्रस्ताव करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक चित्ररथ अयोध्या थीमवर आधारित असेल. या चित्ररथात अयोध्येत होणारा दीपोत्सव सुद्धा दर्शवण्यात येईल. सूत्रांनुसार, चित्ररथावर अयोध्येत होणार्‍या रामलीला मंचनाचे दृश्य असेल.

याशिवाय राफेल लढाऊ विमानांना सुद्धा परेडमध्ये सहभागी करण्यात येईल. याच वर्षी राफेल लढाऊ विमानांचे दोन ताफे फ्रान्सहून भारतात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी कोरोना संक्रमण काळात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराचे भूमीपूजन केले होते.

मागच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर आकर्षणाचे मुख्यकेंद्र होते. या दोन्ही हेलिकॉप्टरने पहिल्यांदाच फ्लायपास्टमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेत तयार झालेल्या चिनूक हेलिकॉप्टरला सुद्धा मागच्या वर्षी मार्चमध्ये 2019 मध्ये हवाई दलात सहभागी केले होते. भारतीय हवाई दलाकडे सध्या 4 ‘चिनूक’ हेलिकॉप्टर आहेत.