तबलिगी जमात 150 देशात सक्रीय, मग सौदी अरब आणि इराणमध्ये पूर्णपणे ‘बॅन’ का ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तबलीगी जमातीचे लोक जगभरात पसरलेले आहेत आणि कोरोना संक्रमणामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये स्थित तबलिगी जमातीचे मरकजपासून जगभरातील 150 देशापेक्षा जास्त ठिकाणी जमाते इस्लामच्या प्रचार प्रसारासाठी जातात. एवढेच नाही तर जगभरातील अनेक देशातील तबलिगी जमातेची लोक भारतात येतात. परंतु सौदी अरबमधून जेथून इस्लामला सुरुवात झाली तेथेच तबलिगी जमात पूर्ण पणे बॅन म्हणजे या जमातीवर बंदी आहेत, याशिवाय इराणमध्ये देखील यांना इस्लामचा प्रचार प्रसार करण्याची परवानगी नाही.

मौलाना इलियास कांधलवी यांनी 1927 साली तबलिगी जमातीचे गठन केले होते, हे देवबंदी विचारधाराने प्रेरित आणि मुसलमानांमध्ये हनफी संप्रदाय मानणारे आहेत. इलियास कांधलवी पहिली जमात दिल्लीजवळील हरियाणाच्या मेवातमध्ये मुस्लिम समुदायातील लोकांना धर्मिक शिक्षा देण्यास गेले होते. यानंतर तबलिगी जमातीचे काम जगभरातील अनेक देशात पसरले, परंतु सौदी अरब आणि इराणमध्ये तबलिगी जमात आपली जागा बनवू शकली नाही.

सौदी अरबमध्ये सलफी मसलक संप्रदाय मानणारे लोक जास्त आहेत. तेथे मस्जिद इमाम देखील अधिकतर सलफी मसलक यांचीच आहे. तर तबलिगी जमातीचे लोक हनफी मसलकचे (संंप्रदाय) आहेत. त्यांच्यात धार्मिक आणि वैचारिक मतभेद असल्याने एकप्रकारे सौदी अरबमध्ये तबलिगी जमातीवर बंदी आहे कारण सलफी मसलकमध्ये इस्लामचा प्रचार प्रसार याबाबत कोणतेही प्रतिबंध नाहीत.

याशिवाय सौदीमध्ये मस्जिदांची सर्व जबाबदारी सरकारकडे आहे. तेथे मस्जिदीत कोणालाही थांबण्यास परवानगी नाही आणि ना की कोणत्याही प्रकारे धार्मिक गर्दी करता येते. तर तबलिगी जमातीचे लोक मस्जिदीत जाऊन राहतात आणि लोकांमध्ये प्रचार प्रसार करतात. यामुळए तबलिगी सौदी अरबमध्ये बॅन आहे. याशिवाय अरबमध्ये हा देखील एक तर्क आहे की येथूनच इस्लाम सर्व जगात पसरला, त्यामुळे आम्हाला इस्लामबद्दल सांगणारे बाकी कोण ?

सौदी अरबमध्ये तबलिगी जमातीशिवाय दुसऱ्या मुस्लिम संप्रदायाच्या क्रियाकलापवर देखील बॅन आहे. कोणत्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमास परवानगी नाही ना की कोणी वर्गणी गोळा करु शकतो. एवढेच नाही तर सौदी अरबने तबलिगी जमातीवर प्रतिबंध करण्यासाठी त्यासंबंधित पत्रक देखील काढलेले आहे.

सौदीसह इराणमध्ये देखील तबलिगी जमातीला प्रवेश नाही, सौदीमध्ये ज्याप्रमाणे सलफी संप्रदायाची बहुलता आहे तर इराणमध्ये शिया संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि सत्ता देखील त्यांच्याकडेच आहे. तबलिगी समाज आणि शिया संप्रदायामध्ये वैचारिक मतभेद आहेत. शिया संप्रदायाच्या धार्मिक कार्याला शिया समुदायाचे लोक योग्य मानत नाही. येवढेच नाही तर तबलिगी जमातीच्या लोकांना इराणमध्ये लपून छपून काम करण्यास देखील प्रतिबंध आहे.

दिल्लीत निजामुद्दीन स्थित तबलिगी जमातीच्या मरकज पासून ते पाकिस्तानमधअये लाहोरच्या जवळ रायविंडजवळचे तबलिगी जमातीच्या मरकज पासून जगभरातील जवळपास 150 पेक्षा जास्त देशांसाठी अनेक जमाते काढण्यात येतात. 40 दिवस आणि चार महिन्यासाठी काढण्यात येणाऱ्या या जमाती विदेशात जातात. काही जमाती जेव्हा काही दिवसांसाठी येतात, त्यांना स्थानिक स्तरावर निश्चित केले जाते. हा कालावधी समाप्त झाल्यानंतर आपापल्या घरी जातात आणि रोजच्या कामाला लागतात.