Tadoba National Park | वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात (Tadoba National Park) वाघाच्या हल्ल्यात (tiger attack) मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे (Swati Dhomne) यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांत्वन केले आहे. मृत स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत (Tadoba National Park) घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

 

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची (Tadoba National Park) तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मृतक स्वाती ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच स्वाती ढुमणे त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत समावून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

 

नेमकं काय घडलं ?

स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची (Tiger count) पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.97 येथे पोहचल्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत 4 वनमजूर होते. त्यांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.

 

जंगलात आढळला मृतदेह
यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अधिक कुमक बोलावण्यात आली. तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी (Tadoba National Park) दाखल झाले. त्यांनी आसपासच्या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. वरिष्ठ अधिकारी-अधिक कुमक आल्यावर शोध मोहिमेत स्वाती यांचा मृतदेह घनदाट जंगलात आढळला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या (Forest Department) वतीने पूर्वतयारी केली जात आहे.

 

वाघाचा पाठिमागून येऊन हल्ला
सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने Transect line survey चे काम केले जात आहे.
सकाळी 7 वाजता कोलारा भागात याच कामासाठी पथक पोचले होते.
मात्र 4 किमी आत गेल्यानंतर रस्त्यावर वाघ असल्यामुळे पथकाने मार्ग बदलला.
मात्र वाघाने मजुरांच्या मागून चालत असलेल्या स्वाती यांना लक्ष्य केले.

 

Web Title :- Tadoba National Park | CM uddhav thackeray announces financial aid and job to family member of forest ranger swati Dhomne who died in tiger attack Tadoba National Park marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr. Amol Kolhe | राज्याच्या तिजोरीच्या सक्षमतेवर मुख्याध्यापक अन् शिक्षकांचे निर्णय अवलंबून – खासदार डॉ.अमोल कोल्हे (व्हिडिओ)

Sean Whitehead | दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ ऑल राऊंडरने अनिल कुंबळेला मागे टाकत एका इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स

Devendra Fadnavis | 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित ! महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न कोण करतंय? देवेंद्र फडणवीसांचा सवाल