Lockdown : नागरिकांकडून तक्रारी झाल्या प्राप्त, तहसीलदारांनी केले रेशनिंगच्या दुकानदारांवर गुन्हे दाखल

मुरबाड पोलीसनामा ऑनलाइन -रिपोर्टर अरुण ठाकरे: कोरोना व्हायरस संकटा मध्ये लॉक डाऊन मध्ये उपासमारी अली असताना शासनाने दिलेल्या रेशनीग वाटप रेशनीग दुकानदाराने काळाबाजार केला असता समजताच तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानात शासनाकडून लाभार्थ्यांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा अपहार केल्याप्रकरणी मुरबाड तालुक्यातील तळेगावचे रेशन दुकानदार पांडुरंग रामचंद्र पारधी आणि खरशेत उमरोली चे दुकानदार गणपत रामचंद्र पारधी यांच्यावर महसूल नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी बंडु जाधव यांनी अत्यावश्यक से वस्तू कायदा 1955 कलम 3 व कलम 7 या अंतर्गत टोकावडे पोलिस स्टेशन येथे काल सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.

तहसील कार्यालयाला नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन सदर दुकानांची सखोल तपासणी केली असता सदर दुकानात दुकानदारांनी धान्याचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने मा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमोल कदम यांनी संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना संकटाच्या काळात सर्व स्वस्त धान्य दुकानदार, किरकोळ किराणा विक्रेते यांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जर कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आला तर सखोल चौकशी करून नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.प्रत्येक गावातील ग्रामस्तरीय समितीने धान्य वाटप वेळेत आणि नियमानुसार होते अगर कसे हे तपासावे व गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ पुरवठा विभागाच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी असे आवाहन तहसीलदार अमोल कदम यांनी केले आहे.