AAP चा निलंबीत नगरसेवक ताहिर हुसेनला भर चौकात गोळया घाला, भाजपाच्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचारात आप चा निलंबित  कालच पोलिसांना शरण आला असून त्याने हिंसाचारादरम्यान घरातून पेट्रोल बॉम्ब, दगड, अ‍ॅसिड हल्ला केला होता. दरम्यान उत्तरप्रदेशचे भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी सांगितले की ताहिर हुसेन हा दहशतवादी असून त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत. संगीत सोम हे गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

संगीत सोम म्हणाले की, ताहिर हुसेन सारख्या दहशतवादी लोकांना भर चौकात उभे करून गोळी मारायला हवी. तसेच ज्याने कोणी आयबी अधिकारी अंकीत शर्माची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच ते नागरिकत्व संशोधन विधेयकावर देखील बोलले, ते म्हणाले की कोणीही कितीही विरोध केला तरीही सरकार हे विधेयक मागे घेणार नाही.

विशेष म्हणजे संगीत सोम यांच्यावर २०१३ मध्ये मुजफ्फरनगर येथे दंगल भडकविण्याचा आरोप आहे. या हिंसाचारावेळी ६० लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारोंच्या संख्येने लोक स्थलांतरीत झाले होते. त्यांचे वकील अनिल जिंदाल यांनी सांगितले की, संगीत सोम यांच्याविरोधात २०१३ मध्ये खतौली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख ठेवण्यात आली आहे.