अभिनेता आयुषमानच्या पत्नीला ‘ते’ म्हणाले हा तर ‘आयुषमानचा भाऊ’ ; ताहिराने दिलं ‘ठासून’ उत्तर

मुंबई :वृत्तसंस्था – बॉलिवूड सेलिब्रिटी बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात. काही ट्रोलर्सला उत्तर देतात तर काही त्यांच्याकडे दु्र्लक्ष करतात. जर आयुषमान खुरानाची पत्नी ताहिराबद्दल बोलायचे झाले तर ती नेहमीच ट्रोलर्सला आपल्या बिंधास्त अंदाजात उत्तर देत असते. एकदा ताहिरा आयुषमानच्या आर्टीकल १५ च्या स्क्रिनिंगला गेली होती.

अनेकदा सोशल मीडियावर ताहिराला तिच्या लहान केसांमुळे आयुषमानचा भाऊ म्हणून ट्रोल केलं जातं. आयुषमानच्या आर्टीकल १५ च्या स्क्रिनिंगला आली असताना ताहिराने आयुषमानसोबतचा एका फोटो पोस्ट केला आणि टोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘मी थेट उत्तर देत आहे’ : ताहिरा

आयुषमानसोबत फोटो पोस्ट करताना ताहिराने लिहिले की, “इतके भाई भाई जोक्स ऐकले आहेत की, आयुषमानला भेटल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणंच सुरु असतं- तू मेरा, तू मेरा, तू मेरा भाई नहीं है | आणि हो मी फुकेर बॉईजसारखं प्रश्न विचारत नाहीये तर थेट उत्तर देत आहे.”

ayushman and tahira

‘मी स्वत:ला कधीच लहान केसांमध्ये इमॅजिन नव्हतं केलं’

आयुषमानची पत्नी ताहिरा कॅन्सरने पीडित असल्याची माहिती गेल्या वर्षी समोर आली होती. यानंतर तिने किमोथेरपीची मदत घेतली होती. यामुळे ताहिराच्या डोक्यावर केस राहिले नाही त्यामुळे ती पूर्णपणे टकली झाली होती. यावर बोलताना ताहिरा म्हणते की, “मी स्वत:ला कधीच लहान केसांमध्ये इमॅजिन नव्हतं केलं.” एका मुलाखतीत ताहिरा म्हणाली होती की, “आयुषमान असा पती आहे जो प्रत्येक मुलीला हवा असतो. त्याने मला प्रत्येक पावलावर साथ दिली आहे.”

tahira

‘त्या’फोटोमुळे ताहिरा सापडली होती वादात

ताहिराने ट्रोलर्सला उत्तर देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तिने याआधीही काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी ताहिराच्या एका फोटोवरून गोंधळ झाला होता. या फोटोत ती बुद्धाच्या पुतळ्याच्या मांडीवर बसलेली दिसत होती. ट्रोलर्सने ताहिरावर सडकून टीका केली होती. नंतर लोकांच्या भावना पहात ताहिराने सोशल मीडियावर याबद्दल माफी मागितली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे