1.25 लाखाची लाच घेताना तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहाय्यक मरकड अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील गंगापूरचे तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे आणि महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांनी पूर्वजांचा जमिनीच्या ७/१२ वरील कूळ कायद्याप्रमाणे असलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी शेतकऱ्याकडे तब्बल १ लाख २५ हजारांची लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB) तहसीलदारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

तहसील कार्यालयातील तहसील आणि महसूल सहायक या दोघांनी १ लाख २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. यावरून तक्रारदाराने (शेतकरी) थेट तक्रार औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानंतर त्याठिकाणी सव्वा लाखापैकी सत्तर हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार अविनाश शिंगटे आणि महसूल सहायक अशोक मरकड यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.