Tahsildar Jyoti Deore Transfer | अखेर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली

ADV

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन | पारनेरच्या (parner) तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Deore Transfer) यांनी लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार महिला आयोग (women commission) आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे (nashik divisional commissioner) दाखल केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नसल्याचा अहवाल समितीने दिला असून देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये मात्र तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर(Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी सरकारच्या वतीनं तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Deore Transfer) यांची जळगावला (Jalgaon) बदली केली आहे.

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणुन घ्या आजचे दर

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (ncp mla nilesh lanke) यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करणारी तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Deore Transfer) यांची ऑडिओ क्लिप (Audio Clip) गेल्या महिन्यात व्हायरल झाली होती. या प्रकरणाला राजकीय वळण लागले. देवरे यांनी महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली. चौकशीमध्ये तथ्य आढळले नसल्याचा अहवाल समितीने दिला आहे. तर दुसरीकडे काही ग्रामस्थांनी देवरे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. त्यामध्ये मात्र कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका देवरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देवरेंच्या तक्रारीत तथ्य आढळून आलेलं नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानं त्यांची जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी बदलीचे आदेश काढला आहे. हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असंही त्यात नमूद केलं आहे. दरम्यान पारनेरला अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

हे तर आमदार, मंत्री, बगलबच्चे धार्जिणे सरकार : चित्रा वाघ

ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्या चित्र वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी देवरे यांची भेट घेतली होती. देवरेंची जळगावला बदली झाल्यावरून वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.महाआघाडी सरकार आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. असे त्या म्हणाल्या.

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो’ (व्हिडीओ)

Modi Government | सरकारी कर्मचार्‍यांना 2,18,200 रुपये देईल मोदी सरकार, ऑक्टोबरमध्ये अकाऊंटमध्ये येऊ शकतात पैसे, जाणून घ्या

Pune Crime | मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

Supreme Court | अविवाहित किंवा विधवा मुलीलाच अनुकंपा खाली होणार्‍या नियुक्तीसाठी अवलंबित मानले जाईल – सुप्रीम कोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Tahsildar Jyoti Deore Transfer | parner tehsildar jyoti deore transferred jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update