तहसीलदार मेटकरी यांची वाळुमाफियांविरोधात धडाकेबाज कारवाई

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन

देवा राखुंडे

इंदापूर तालुक्यातील अवैध्य वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफिया विरोधात इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दणकेबाज कारवाई करत वाळुमाफियांच्या मुसक्या आवळल्या. इंदापूर तहसील पदी नव्यानेच नियक्त झालेल्या सोनाली मेटकरी यांनी या आठवड्यात केलेली ही दुसरी कारवाई आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10ea1682-b7f4-11e8-9dd9-fb6c3bf4d3fa’]

शुक्रवार दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता ही कारवाई तक्रारवाडी गावचे वनविभाग हद्दीत उजणी जलाशय पात्रात करण्यात आली. एक जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने वाळू काढावयाच्या बोटिंचा अवघा चक्काचूर करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दनानले असून यापुढे वाळू माफियांविरोधात प्रशासन कडक कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत असा इशारा प्रशासनाने दिला आहे. गत तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे बदली नंतर फना वर काढलेल्या वाळू माफियांना तहसीलदार मेटकरी कारवाईचा बडगा उगारल्याने वाळुमाफियांच्या पायाखालील वाळू सरकलो आहे.

 या कारणाने  गौतम गंभीरची ‘स्त्री ‘ वेशात एन्ट्री 

यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी पवन आहेर, पोलिस हवालदार विलास मोरे, पोलीस पाटील अमर धुमाळ, मंडल अधिकारी एम.एस.तांबडे, तलाठी पाटील, कांबळे, दराडे व महसूल कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.