×
Homeशहरमुंबईभाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले - 'ताई, तेथील आमदार...

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटकाळात अनेक ठिकाणी माणूसकी हरवल्याच्या, प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घटना समोर येत आहेत. अशातच भाजपा BJP नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनीही बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरची अशीच एक घटना उघडकीस आणली आहे. वाघ यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एका 8 वर्षीय शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून कोविड सेंटरमधील संडास साफ करुन घेतल्याची संतापजनक घटना घडल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणीही केली आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटवर काही जणांना संग्रामपूरचे स्थानिक आमदार संजय कुटे हे भाजपाचेच BJP असल्याची आठवण करुन दिली. तसेच स्थानिक भाजपा आमदाराची जबाबदारी नाही का? असा सवालही नेटकऱ्यांनी वाघ यांना विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

अतिशय गंभीर व संतापजनक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मारोड गावातील शाळेच्या विलगीकरण कक्षात घडला आहे. या विलगीकरण कक्षात 15 कोविड पेशंट असतांना 8 वर्षाच्या शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून संडास साफ करून घेतले आहे. लाज वाटली पाहिजे प्रशासनाला, असे म्हणत चित्रा वाघ Chitra Wagh यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ट्विटमध्ये मेन्शन केले आहे.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News