तैमूर आणि इनायाच्या फोटोची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड मधील सगळ्यात क्युट मानला जाणारा सैफीनाचा मुलगा तैमूर अली खान आणि अभिनेत्री सोहा अली खान- कुणाल खेमू ची मुलगी इनाया खानचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. नुकताच सोहा अली खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तैमूर आणि इनायासोबत खेळतांना दिसता आहेत आणि दुसऱ्या फोटो मध्ये तैमूरने आपली बहीण इनायाचा हात पकडलेला दिसतो आहे.
https://www.instagram.com/p/B0F27R2BJRa/

दुसऱ्या फोटोमध्ये दोघांचा चेहरा दिसत नाहीये. परंतु दोघांच्या टी-शर्टवर माघुन (TIM आणि INNI ) असे लिहिले आहे. ते दोघे सोबत इतके क्युट दिसता आहेत की, त्यांचे फोटो सोशलवर खूप व्हायरल झाले आहेत.

व्हायरल झालेले फोटो लंडनमधील आहेत. तैमूर आपल्या आई-वडिलांसोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतो आहे. आणि आता कुणाल खेमू आणि सोहा देखील लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत आणि सैफ लंडन मध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘जवानी जानेमन’ च्या शूटिंगसाठी गेला आहे. चित्रपटामध्ये तो पूजा बेदीची मुलगी आलीया फर्निचरवालाच्या वडिलांची भूमिका करणार आहे आणि करीना कपूरने ‘अंग्रेजी मीडियम’ ची शूटिंग लंडन मध्ये पूर्ण केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like