‘सैफ-करीना’ चा लाडका तैमूर बनला ‘लिटील लायन’, क्युट फोटोची सोशलवर ‘चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर नेहमीच आपल्या क्युट हरकतींनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. एवढ्याशा तैमूरची आताच भली मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्याच्या नावानं अनेक फॅनपेज आहेत. सध्या तैमूरचा एक फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोत तैमूरनं लायनचा मेकअप केला आहे. या मेकअपनंतर तैमूर आणखीच क्युट दिसत होता. हा फोटो करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीचा आहे. यश आणि रूहीच्या बर्थ डे पार्टीत कोणीतरी तैमूरच्या चेहऱ्यावर हा मेकअप केला आहे. तैमूरचा हा क्युट फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तैमूरनं आपल्या फोटोनं पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

नुकताच तैमूरचा एक व्हिडीओ समोर आला होता जो व्हायरल होताना दिसला. ज्यात तैमूर ड्रम वाजवताना दिसत होता. हा व्हिडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओनंतर आता क्युट फोटोनं तैमूरनं सोशलवर धुमाकूळ घातला आहे.

https://www.instagram.com/p/B8N0qgfBnIy/?utm_source=ig_embed

करण जोहरच्या मुलांच्या बर्थडे बॅशमध्ये करीना कपूर, फराह खान, एकता कपूर, तुषार कपूर, आलिया भट, नीलम, रितेश देशमुख, सोहा अली खान याशिवाय इतरही अनेक कलाकार उपस्थित होते.