‘Same To Same’ सैफसारखाच दिसतो करीनाचा ‘लाडका’ तैमूर, फोटो पाहून चाहतेही ‘अवाक्’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर होळीनंतर खूपच चर्चेत आला होता. होळी साजरी करतानाचे त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर आता त्याचा तो फोटो व्हायरल होत आहे ज्यात तो सेम टू सेम त्याचे पप्पा सैफ अली खान सारखा दिसत आहे. या फोटोनं सोशल मीडियावर खूप अटेंशन घेतलं आहे. लोकांनी तर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

https://www.instagram.com/p/B9pBjeRFcZg/?utm_source=ig_embed

तैमूर आणि सैफचा लहानपणीचा हा फोटो इंस्टावरून शेअर करण्यात आला होता. या फोटोत सैफ आणि तैमूरचा फोटो कोलाज केला होता. एका बाजूला सैफचा लहानहणीचा फोटो आणि एका बाजूला तैमूरचा फोटो होता. दोघांच्या चेहऱ्यात एवढं साम्य आहे की, दोन्ही फोटो जणू तैमूरचे आहेत असं वाटत आहे. या फोटोला छान असं कॅप्शनही देण्यात आलं होतं.

फोटोत दिसत आहे की, सैफचा हेअरकट आणि स्माईल जशी आहते सेम तशीच हेअरस्टाईल आणि तशीच स्माईल तैमूरच्याही चेहऱ्यावर दिसत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट केली आहे. तैमूर सैफ अली खानची कॉपी आहे असंच सगळे म्हणत आहेत. तैमूरनं या फोटोनं पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.