मामाच्या लग्नात डान्स केल्यानंतर मित्राच्या ‘बर्थडे’ पार्टीत तैमूरनं वाजवला ‘ड्रम’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये सगळ्यात आवडता निर्माता करण जोहर यांच्याप्रमाणेच त्यांची मुलेही स्टार्सचे आवडते आहेत. करण जोहरची मुले यश आणि रुही जोहर या दोघांच्या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यांच्या बर्थडे पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीचे अनेक स्टार्स मस्ती करताना दिसले.

यश आणि रुही यांच्या पार्टीत बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्सच्या मुले देखील आले होते. या वाढदिवसाच्या पार्टीत स्टार किड्सचा मेळावा पाहायला मिळाला. यामध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरचा लाडका मुलगा तैमूर अली खान, तसेच कुणाल खेमूची मुलगी इनाया नाओमी खेमू आणि एकता कपूर यांचा मुलगा रवी व अन्य स्टार किड्सचा समावेश होता.

https://www.instagram.com/p/B8N0qgfBnIy/?utm_source=ig_embed

सर्व मुलांनी या पार्टीचा खूप आनंद लुटला. अशा परिस्थितीत तैमूर अली खानची वेगळी स्टाईल सर्वांना पाहायला मिळाली. यश आणि रुही यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये यश, रुही, तैमूर आणि इनाया एका व्हिडिओमध्ये मजा करताना दिसत आहेत. दुसर्‍या व्हिडिओमध्ये तैमूर एक छोटा ड्रम वाजवताना दिसत आहे.

करण जोहरच्या मुलांच्या बर्थडेदिवशी बॅशमध्ये करीना कपूर, फराह खान, एकता कपूर, तुषार कपूर, आलिया भट्ट, नीलम, रितेश देशमुख, सोहा अली खान यांच्यासह अन्य स्टार आले होते. या सर्वांनी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवला. करण जोहरला सेरोगेसीच्या मदतीने सन 2017 मध्ये यश आणि रुही जुळी मुले झाली. 7 फेब्रुवारीला यश आणि रुही आपला तिसरा वाढदिवस साजरा करणार आहे.