#Video : सैफ अली खानच्या कडेवर असणारा तैमूर जोरात मम्मी-मम्मी ओरडला, करीनाने दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर यांची जोडी चाहत्यांना विशेष आवडते. दोघेही त्यांच्या रोमँटीक केमिस्ट्रीमुळे आणि तैमूरमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या पुन्हा एकदा या स्टार फॅमिलीचा एक व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याशिवाय या तिघांचे काही फोटोही समोर आले आहेत. तेही सोशलवर शेअर होताना दिसत आहेत.

या फोटो आणि व्हिडीओत दोन्ही गोष्टी खूप खास आहेत. सैफ अली खानचा लेटेस्ट लुक. या फोटोंमध्ये सैफ समर लुकमध्ये खूपच कूल दिसत आहे. करीनाही यावेळी सैफच्या नवीन लुकसोबत मस्त पोज देताना दिसत आहे.

यातील दुसरी खास गोष्ट अशी आहे की, सैफ आणि करीनाच्या दोन वर्षाच्या तैमूरचे नखरे. सैफ आणि करीना मुलगा तैमूर सोबत शॉपिंगला गेले होते. यावेळी सैफने तैमूरला कडेवर उचलून घेतले होते. पैपराजी आणि त्यांच्या चाहत्यांना पाहून तैमूर नेहमीच उत्साहित दिसून येतो. परंतु यावेळी मात्र तैमूर नखऱ्याच्या मूडमध्ये दिसत होता.

करीना ही तैमूर आणि सैफच्या पुढे चालत होती. अशातच पप्पाच्या कडेवर असणारा तैमूर जोर जोरात मम्मी-मम्मी ओरडायला लागला. त्याचा आवाज ऐकताच करीना लगेचच वळून पाहिले आणि आणि एक प्रकारची खूपच केअरींग रिअॅक्शन दिली. याशिवाय तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, तैमूरचे हे नखरे अगदी गाडीत बसेपर्यंत सुरु होते.

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, करीना लवकरच अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या सिनेमात दिसणार आहे, तर इरफान खान सोबत अंग्रेजी मीडियम या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान सैफ अली खानच्या सेक्रेड गेम्स या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.

https://www.instagram.com/p/Bx4Cp0RBR-u/?utm_source=ig_embed