‘स्टारकीड’ तैमूर आता आई करीनासोबत ‘या’ चित्रपटात झळकणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मिडीयावर धूळमाकूळ घालणाऱ्या स्टारकीड सेलिब्रेटी तैमुरने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या गोंडस मुलाची नेहमीच चर्चा असते. तैमूर घरातून बाहेर पडताच त्याच्या भोवती गर्दी जमा होते. त्याला लोक खूप जास्त पसंत करतात. एवढेच नाही तर त्याच्या नावाचे अनेक पेजेस देखील तुम्हाला सोशलवर पाहायला मिळतील. पण लवकरच तैमूर आपली आई करीना कपूर सोबत चित्रपटात दिसणार आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार “गुड न्यूज” नावाच्या चित्रपटात तैमूर झळकणार आहे.

View this post on Instagram

❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

“गुड न्यूज” चित्रपटात तो १० मिनिटांच्या छोट्याशा भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या सेटवरचा कियारा अडवाणी आणि तैमूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी तैमूर शूटिंगसाठी तिथे गेला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘गुडन्युज’ चित्रपटात अक्षय कुमार आणि करिनासोबत कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज अशी स्टार कास्ट दिसणार आहे.

View this post on Instagram

#kiaraadvani #actress

A post shared by Celebrity Lifestyle (@celebritylife.insta) on

 

यापूर्वी देखील प्रसिद्ध दिगदर्शक मधुरा भांडारकर तैमुरवर चित्रपट काढणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र. तैमुरवर कोणताच चित्रपट बनवणार नसल्याचे मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केले होते. तैमूरवर चित्रपट येण्याच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला होता. आता “गुड न्युज” चित्रपटात केवळ १० मिनीटांसाठी तैमूर पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

#currentmood 😗❤❤❤ #taimurdiaries👶

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like