Taj Mahal | ताज महालसंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतिहासाच्या पुस्तकांत ताजमहाल (Taj Mahal) संदर्भात देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचा दावा करत, ती हटविण्याची मागणी करण्यात आलेली याचिका सुनावणीस घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेत ताज महालचे (Taj Mahal) वय निश्चित करण्याबरोबरच बांधकामासंबंधी इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आलेली चुकीची माहिती हटविण्याचे निर्देश पुरातत्त्व विभागाला देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका सुनावणीयोग्य नाही, असे म्हटले आहे. ही कशा प्रकारची याचिका आहे? असा प्रश्न यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. ऐतिहासिक तथ्य खरे की खोटे, हे न्यायालय कसे तपासणार? असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने याचिका मागे घेण्यास सांगितले. या प्रकरणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे जाण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वीदेखील न्यायालयाने अशाच एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

Web Title :- Taj Mahal | the supreme court rejected that petition regarding taj mahal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Malaika Arora | ‘छैया छैया’ या गाण्यासाठी मलायका अरोरा नव्हे, तर शिल्पा शेट्टीसह ‘या’ अभिनेत्रींना दिली होती ऑफर

Thane ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Jalgaon Dudh sangh | सासूबाईंच्या विरोधात सूनबाई, जळगाव दूधसंघ निवडणूक; रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार