प्रेमाचे प्रतिक असलेल्या ‘ताजमहाल’ला दुर्गंधीचा ‘वेढा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमाचे प्रतीक आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक महत्वाची वास्तू असलेल्या ताजमहालाच्या परिसराला दुर्गंधीने वेढा घातला आहे. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी कामांवर ‘बहिष्कार’ घातल्याने दोन दिवसापासून ताजमहालमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

ताजमहालाला दररोज देश विदेशातील पर्यटक रोज भेट देत असतात. अशावेळी अस्वच्छता आणि घाणीचं, दुर्गंधीचे साम्राज्य पाहून हे पर्यटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत काय विचार करतील? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय विकास ग्रुपचे २८ कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने ही स्थिती उद्भवली आहे. मात्र आम्हाला मागच्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याकडे संपकरी कर्मचारी लक्ष वेधत आहेत. त्यातही एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा पैसे नसल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

या कमर्चाऱ्यांच्या संपामुळे ताजमहाल परिसरात कचरा, घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमधूनही वास येऊ लागला आहे. या प्रकरणी आता भारतीय पुरातत्त्व विभागाने आग्रा महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांची मदत मागितली आहे. ताजमहाल प्रत्येक शुक्रवारी बंद ठेवण्यात येतो.

केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता गुणकारी 

बाळ व बाळंतिणीसाठी गुणकारी आहेत हे घरगुती उपाय 

पेरूची पाने आरोग्यासाठी फायदेशीर, ‘असा’ करा उपयोग 

पुरुषांच्या या समस्येची ‘ही’ आहेत प्रमुख ८ कारणे, घ्यावी ‘अशी’ काळजी

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’