‘या’ सिनेमातील ‘हे’ ‘टकाटक’ साँग आहे मराठीतील सर्वाधिक ‘बोल्ड’ साँग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टकाटक हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्ये म्हणजे धमाल कॉमेडी, बोल्ड सीन आणि डबल मिनिंग डायलॉग आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलेलं आहे. या सिनेमातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. मराठीत सिनेमात इतके बोल्ड सीन असणारं हे पहिलंच गाणं असल्याचं म्हटलं जात आहे. यातील सीन पाहून कदाचित तुम्हालाही असेच वाटेल. सध्या हे गाणं खूप व्हायरल होताना दिसत आहे.

ये चंद्राला असं या गाण्याचं नाव असून अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या गाण्यात रोमान्स करताना दिसत आहे. सध्या गाण्याची बोल्डनेसमुळे खूपच चर्चा होताना दिसत आहे. एका दिवसात या गाण्याला हजारो लोकांनी पाहिले आहे. ये चंद्राला हे गाणं जय अत्रे यांनी शब्दबद्ध केलं आहे तर, श्रुती राणे यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्या ट्रेलरमध्येही अनेक बोल्ड सीन जसे की, किसिंग सीन, टॉपलेस सीन, असे हॉट सीन पाहायला मिळाले होते. अ‍ॅडल्ट कॉमेडी असणाऱ्या या ट्रेलरचीही बरीच चर्चा पाहायला मिळाली. या सिनेमात प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबतच अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
टकाटक या सिनेमाची निर्मिती अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासून आणि रब्रिंद्र चौबे यांनी केली आहे. याशिवाय या सिनेमात प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, भारत गणेशपुरे, उमेश बोलके आदी कलाकारही दिसणार आहेत. हा सिनेमा २८ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
You might also like