‘सोशल’वर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करा’ , गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृह मंत्रालयानं सिटीझनशिप अमेंडमंट अ‍ॅक्टला घेऊन देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारला अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट लागू करण्यासाठी नियम बनवण्यासाठीच्या प्रक्रियेवर कामही सुरू झालं आहे.

केंद्रीय कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे की, “हे खूप दुर्दैवी आहे. या देशात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर याचा परिणाम होणार नाही. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी जातीय तणाव निर्माण करत आहेत. काँग्रेस पक्षही त्यांना साथ देत आहे. हे दुर्दैवी आहे. जसं की पंतप्रधान म्हणाले आहेत, आपण यावर चर्चा आणि वादविवाद करू शकते.”

‘CAA चा भारतीय नागरिकांवर परिणाम नाही’
गृह मंत्रालयानं म्हटलं आहे की, “सिटीझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट(CAA)चा भारतीय नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नाही. 14 हजारांहून अधिक बांग्लादेशातील लोकांना नागरिकत्व देण्यात आलं आहे. सध्या 95 हजारांहून अधिक मूळचे श्रीलंकन नागरिक भारतात रहात आहेत. ज्यांना ते पात्र होतील तेव्हा नागरिकत्व मिळणार आहे . हा अ‍ॅक्ट कोणालाही टारगेट करण्यासाठी नाही.”

सोशल मीडियावर फसव्या बातम्या आणि अफवांविरोधात कारवाईची विनंती
देशातील काही भागात होणाऱ्या हिंसेच्या घटना आणि सार्वजनिक संपत्तीचं होणारं नुकसान पाहता गृह मंत्रालयानं राज्यातील केंद्रशासित प्रदेशांना अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. ज्यात म्हटलं आहे की, “नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, संपत्तीची हानी रोकण्यासाठी सर्व आवश्यक उपाय केले जाणं गरजेचं आहे. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती आहे की, त्यांनी कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत. सोशल मीडियावरील फसव्या बातम्या आणि अफवांना पसरवण्याविरोधात कारवाई करावी जेणेकरून हिंसा भडकण्याची शक्यता कमी होईल.”

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/