सर्वच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या , अन्यथा EVM मशीन फोडण्याचा ‘मास मुव्हमेंट’ या सामाजिक व लढाऊ संघटनेचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक लोकसभा मतदार संघात झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात मोठी तफावत आढळून आली आहे. ई. व्ही. एम. मशीन  हॅक करण्यात आले आहे. असा आमचा आरोप आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचा खुलासा करावा. यापुढील सर्व निवडणूका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात, असा इशारा मास मुव्हमेंट या  सामाजिक व लढाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय विलास जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी मास मुव्हमेंट सामाजिक व लढाऊ संघटनेचे पुणे शहराध्यक्ष मयूर घोडे, पुणे शहर संपर्क प्रमुख दिनेश नवगिरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जगताप म्हणाले, मास मुव्हमेंट ही सामाजिक व लढाऊ संघटना असून संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय, अत्याचार विरोधात काम करते. सन २०१९ रोजी लोकसभा निवडणूक संपूर्ण देशभरात पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्वबळावर ३०० हुन अधिक जागा जिंकल्या याचे मुख्य कारण ई. व्ही. एम. मशीन होय. अशा प्रकारे निवडणुकीत जागा जिंकल्याचा अनेक पक्ष व संघटनांनी संशय व्यक्त केला आहे. देशातील विविध राजकीय पक्षांनी संघटनांनी ई. व्ही. एम. मशीन हॅक होते असे स्पष्ट केले आहे.

ई. व्ही. एम. मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या पाहिजे अशी विविध पक्ष, सामाजिक संघटना व  देशातील सामान्य जनतेची मागणी आहे. त्यासंदर्भात अनेक आंदोलने, निदर्शन झालेली आहेत. आगामी विधानसभा निवडणुका ऑक्टोबर २०१९ मध्ये येतील त्याही  ई. व्ही. एम. मशीनद्वारेच लढविल्या जात आहे. तरी हि धोक्याची घंटा आहे.

ई. व्ही. एम. मशीन बंद करून ती बॅलेट पेपरवर लढवावी अन्यथा लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी ऑक्टोबर २०१९ मध्ये होणारी निवडणूक बॅलेट पेपरने होत असेल तर ते आम्ही आनंदाने स्वीकारू,परंतु निवडणूक  ई. व्ही. एम. मशीनद्वारे होत असेल तर मास मुव्हमेंट हि सामाजिक व  लढाऊ संघटनेच्यावतीने निवडणूक दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील मतदान केंद्रावरील संपूर्ण ई. व्ही. एम. मशीन फोडण्यात येईल, असा इशारा मास मुव्हमेंट या सामाजिक व लढाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय विलास जगताप यांनी दिला आहे.

Visit – policenama.com