Hathras Case : ‘दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा’, अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   हाथरसमधील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. योगींच्य राजीनाम्याचीही मागणी होताना दिसत आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही योगींवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत बसले आहेत. यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करावं आणि जंगल राजवर कडक कारवाई करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

‘योगींनी राजीनामा द्यावा’ : प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत की, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यायचं सोडून योगी सरकारनं त्यांच्या मानवी हक्कांवरच गदा आणण्याचं काम केलं. योगींनी राजीनामा द्यावा.”

मायावती म्हणाल्या, “नातेवाईकांना अंत्यसंस्कार करू न देता पोलिसांनीच परस्पर विधी उरकले हे चुकीचं आहे.”

अखिलेश यादव म्हणाले, “मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. कारण त्यांना सर्व पुरावे नष्ट करायचे होते.”

पहिल्यांदा काही हैवानांनी बलात्कार केला त्यानंतर साऱ्या यंत्रणेनं तेच कृत्य केलं असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like