वायु प्रदूषणात अशाप्रकार करा तुमच्या डोळ्यांची देखभाल, ‘या’ 5 प्रकारे घ्या खबरदारी

पोलीसनामा ऑनलाईन – वायु प्रदूषण झाल्याने श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, मळमळ आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. डोळे सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा भाग आहेत, अशात वायु प्रदूषणापासून त्यांना वाचवणे आवश्यक ठरते. प्रदूषणात डोळ्यांची देखभाल कशी करावी ते जाणून घेवूयात.

1 स्क्रीन डिव्हाइसचा कमी वापर
स्क्रीन डिव्हाइस, जसे की मोबाइल फोन आणि लॅपटॉपचा वापर जास्त काळ करू नका.

2 कॉन्टॅक्ट लेन्स टाळा
डोळ्यात खाज किंवा रेडनेस असल्यास कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3 हेल्दी डाएट घ्या, हायड्रेटेड राहा
मासे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, पालक, अक्रोड आणि जांभूळ असा आहार घ्या. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसात आठ ते दहा ग्लास पाणी प्या.

4 डोळ्यांच्या मेकअपचा वापर करू नका
डोळ्यांना त्रास होत असेल तर अशा स्थितीत मेकअप करून नका. यामुळे संसर्ग वाढू शकतो.

5 प्रदूषकांच्या संपर्कात येणे टाळा
डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हानिकारक प्रदूषकांच्या संपर्कात येऊ नका.

You might also like