अशी घ्या आपल्या रुबाबदार दाढीची काळजी

 डॉ मोहन थॉमस, कॉस्मेटीक सर्जन,कॉस्मेटीक सर्जरी इन्स्टीट्यूट

पोलीसनामा ऑनलाइन – सध्याचा ट्रेंड पाहता पुरुषांमध्ये दाढी ही रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. इतकेच नव्हे तर, त्याच्या रचनेतही वैविध्य आले आहे. त्यातच सध्या अनेक सेलिब्रिटी कलाकार, खेळाडू दाढी राखण्यावर भर देत असल्याने तरुणांमध्ये याची क्रेझ आणखी वाढली आहे. दाढी काढताना शेव्हिंग क्रिम आणि रेझरचा वापर होतो. यांचा सातत्यानं वापर केल्यानं चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचते. पुरुषांच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते.तसंच, चेहऱ्यावर मुरूमांचे प्रमाण वाढते.अनेकदा शेव्हींगदरम्यान चेहऱ्यावर जखमा होतात. त्याचे व्रणही उमटतात. यामुळे पुरुषांच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. प्रत्‍येक पुरुषासाठीदाढी ठेवणे हे त्‍याच्‍या प्रतिष्‍ठेचे लक्षण आहे.

हल्लीच्या काळात दाढीचा आगळावेगळा रुबाब तरुणाईत पाहयला मिळतो. पुरुषांना चकचकीत, गुळगुळीत गाल ठेवण्यात अभिमान व शहाणपणा वाटायचा. पण गेल्या काही वर्षांपासून दाढी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागली आहे. सर्वानाच दाढी वाढवण्याचं खूळ लागलं आहे.

दाढी वाढवणे म्हणजे ‘स्टाइल स्टेटमेंट’ असले तरी त्याची व्यवस्थित निगा राखणे आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्याला सुसंगत होईल अशी दाढीची रचना करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी चेहऱ्याचा आकार लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्टाइल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता खालील बाबींची नोंद घ्या.

1)  दाढी धुणे- 
आठवड्यातून तीन वेळा तरी दाढी धुणे, शॅम्पु करणे गरजेचे आहे.यामुळे दाढीवरील केस स्वच्छ आणि केसांमध्ये मुलायमपणा राहण्यास मदत होईल.तसेच केसांमधील तेलकटपणा दूर होईल आणि खाजेच्या समस्येपासूनही सूटका मिळेल.याकरिता चांगल्या दर्जाचा सल्फेट फ्री शॅम्पु वापरावा. याकरिता बीअर्ड वॉशची गरज नाही.

2)  हायड्रेशन आणि कंडिशनींग –
दाढी धुतल्यानंतर तिला तेल लावणे आवश्यक आहे जेणेकरून कंडिशनींगची गरज पूर्ण होईल आणि दाढीवरील केसांना चमक येईल. याकरिता नैसर्गीक घटकांनी संपूर्ण तेलाचा वापर करावा. हे तेल त्वचेच मुरल्याने खाज सुटत नाही तसेच केसांचा मजबूतीसाठी फायदेशीर ठरते. तेलाचा वापर हा वरील प्रमाणे अंघोळीनंतरच केला पाहिजे.

3)  ट्रीमिंग करणे गरजेचे – 
पुरुषांमध्ये प्रत्येकाच्या चेह-यावर वेगवेगळ्या प्रकारची दाढी येते. कोणाच्या संपुर्ण गालावर दाढी येते तर काहींच्या संपुर्ण गालावर दाढी न येता काही ठिकाणीच येते.

4)  चांगल्या मॉश्चरायझरने नियमित मालिश करा.

5)  दाढीचे वॅक्सींग – 
जेव्हा दाढी एका विशिष्ट आकारात, अथवा ठराविक लूक हवा असल्यास अशा वॅक्सींग सारखा पर्याय उत्तम ठरतो.

6)  दाढी-
मिशा वाढवताना चेहऱ्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या. आठवडय़ातून दोनदा ‘क्लीन्सनर’ ने चेहरा व दाढीचा भाग धुवा. त्यामुळे दाढीच्या केसांखाली असलेल्या मृतपेशी दूर होतात व केसांची वाढ लवकर होते.

7)  डिझायनर दाढी –
आपल्या चेहर्‍यावर चांगले दिसणारे दाढीचे आकार (डॉ. मोहन थॉमस यांच्यासारख्या तज्ञाद्वारे सुचवले जाऊ शकतात)अनावश्यक केस कायमचे काढून टाकले जाऊ शकतात. कॉस्मेटिक शस्त्रक्रियातंर्गत वेदनारहित सेझर उपचार पध्दतीने अनावश्यक केस काढण्यात येतात. याला यूएस एफडीएची देखी मंजूरी आहे. सर्वोत्तम निकालांसाठी एकापेक्षा अधिक सेशन्सची गरज आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like