पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घ्या ‘हा’ आहार ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणापेक्षाही वाढलेले पोट आपल्याला अजिबात आवडत नाही. पण आपली इच्छा असो वा नसो आपले आहाराकडे थोडे दुर्लक्ष झाले की आपल्या पोटावरची चरबी वाढायला लागते. काहीजणांचं शरीर सर्वसाधारण दिसतं, पण पोटाचा घेर मात्र प्रचंड वाढलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष केले की आपल्या पोटाचा घेर वाढायला लागतो आणि आपण जर काही खाद्यपदार्थ आहारात नियमित ठेवल्यामुळे पोटाचा घेर कमी करायला मदत होऊ शकते.

१) सकाळी कॉफी किंवा चहामध्ये दालचिनी पावडर घालून रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवू शकाल. आहारातून साखर घालवण्याचा हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.

२) सुका मेवा नियमित खाल्ल्यास शरीरातील चरबी कमी होऊ शकते. बदाम, शेंगदाणे किंवा अक्रोड नियमित खा. सुक्या मेव्यात चरबी वाढवणारे घटक असतात हे खरे, पण ही चरबी आरोग्यदायी असते. शरीरासाठी ती गरजेची असते.

३) लठ्ठ माणसांना भूक आवरत नाही. पण जेव्हा भूक लागेल तेव्हा आपल्याजवळ ठेवलेले संत्रे खा. यामुळे पोट तर भरतेच, पण लठ्ठपणाही वाढत नाही.

आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. आरोग्याला अपायकारक असे डेजर्ट खाण्यापेक्षा दही खा. यात खूप पोषकद्रव्ये असतात, पण कॅलरीज अजिबात नसतात.

४) दिवसभरातून किमान एक कप ग्रीन टी घेतल्यास त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाखालची चरबी कमी व्हायला मदत होते.

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमीन-सी मुबलक असते. त्यामुळे शरीरातील चरबी ऊर्जेमध्ये परावर्तीत करण्याची शक्ती असते.

५) पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. दररोज सकाळी लिंबूपाणी प्या. यामुळे चरबी कमी होईल.

आरोग्यविषयक वृत्त –