खुशखबर ! लवकरच वाढणार तुमचा पगार, सरकार करणार EPFO च्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार आहे. केंद्र सरकार नोकरदारांच्या प्रॉविडेंट फंडमधील (Provident Fund) योगदानात कपात करण्याचा पर्याय देण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे त्यांची टेक होम सॅलरी वाढू शकते. कामगार मंत्रालयाकडून प्रस्ताव मांडण्यात आला आहे की प्रॉविडेंट फंडमध्ये कंपनीकडून देण्यात येणारे योगदान 12 टक्के कायम ठेवण्यात येईल. हे मुद्दे सोशल सिक्युरिटी विधेयक 2019 मध्ये सहभागी आहेत, ज्याला मागील आठवड्यात कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली.

मंत्रालयाने EPFO आणि एंप्लॉयीज स्टेट इंश्योरेंस कॉर्पोरेशनची सध्याची स्वायत्तता कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतू काही दिवसांपासून ते कॉर्पोरेटमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

या लोकांना देण्यात आली सामाजिक सुरक्षा –
या विधेयकाच्या माध्यामातून 50 कोटी लोकांनी सामाजिक सुरक्षा देण्यात येणार आहे. या विधेयकात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या अंतर्गत एक सामाजिक सुरक्षा कोष तयार करण्यासाठी सोशल सिक्युरिटी फंड बनवण्याचा विचार मांडला होता. यात सांगण्यात आला की सर्व कामगारांंना पेंशन, मेडिकल, आजारपण, मातृत्व, मृत्यू आणि अपंगत्व यासंबंधित वेलफेअर बेनिफिट्स देण्यात येतील.

या आठवड्यात सोशल सिक्युरिटी विधेयक संसदेत सादर होणार –
– कामगार मंत्रलयाने EPFO सब्सक्राइबर्सला नॅशनल पेंशन सिस्टममध्ये शिफ्ट करण्यात पर्याय देण्याचा प्रस्ताव देखील परत घेतला. कामगार मंत्रालयाने आपल्या निर्णयाच्या हक्कात EPFO तून मिळणारा चांगला रिटर्न आणि इतर फायद्याची माहिती दिली होती.

– ज्या कंपनीत 10 पेक्षा कमी कामगार काम करतात. ते ESIC च्या योजनेअंतर्गत स्वैच्छिक रुपात हे फायदा आपल्या वर्कर्सला देऊ शकतात. याबरोबर फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स प्रो राटा बेसिसवर ग्रॅच्युटी मिळवण्याचा विचार करत आहे. त्यांना यासाठी आता एका कंपनीमध्ये कमीत कमी 5 वर्षापर्यंत काम करावे लागले. सोशल सिक्युरिटी कोडमध्ये 8 केंद्रीय कामगार कायद्यांना स्वीकारण्यात येतील.

– असे ही सांगण्यात आले की, EPFO वर प्रत्येक स्तरावर गुंतवणूकदारांना करात सूट मिळत आहे. असे मानले जाते की सोशल सिक्युरिटी विधेयकाला संसदेत सादर करण्यात येईल. विधेयकानुसार, या विभागात कमीत कमी 10 कामगार काम करतात, त्यांना ESIC अंतर्गंत काही फायदे द्यावे लागतील आणि हे धोकादायक काम करणाऱ्या कामगारांसाठी अनिवार्य असेल.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like