शिंगावर घेणे हा आमचा खाक्या ! शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरेंचा  ठाकरी बाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई – सध्या देशात निडवणूकांच वातावरण आहे. बुधवारी मुबंईमध्ये ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर’ या पुस्कार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंगावर घेणे हा आमचा खाक्या आहे.असे वक्तव्य केले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे उपस्थित होते.उध्दव ठाकरे यांचे हे उद्गार राजकीय विरोधकांच्या रोखाने की मित्र पक्षाला उद्देशून अशी चर्चा नंतर उपस्थितांमध्ये सरु झाली .
या पुस्कार सोहळ्यात उध्दव ठाकरे यांना ‘पाॅवर आयकॉन ऑफ दि इयर’ हा पुस्कार ख्यातनाम समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ठाकरे असे म्हणाला, आता मी मुख्यमंत्र्यांना विचारतो की, HOW IS JOSH ! राजकारणावर बोलायला पुढचा महिना आहे. मात्र सोबत आला तर ठिक, नाहीतर शिंगावर घेतले शिंगावर हा आमचा खाक्या आहे.असे या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. पुलवामा हल्याबद्दल या पुरस्कार सोहळ्यालाही आज हल्ल्याची झालर आहे. आपण पाकिस्तानचे कंबरडे कसे  मोडतो त्याची देश वाट पाहत आहे.आपण सगळ्यांनी एकत्रीत येऊन पाकिस्तानच्या पेकाटात अशी लाथ घाला की, परत भारतावर हल्ला करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे.
मी हा पुरस्कार माझ्या शिवसैनिकांच्या वतीने स्वीकारत आहे. आणि हा पुरस्कार शिवसैनिकांना अर्पण करत आहे.या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारणाऱ्या लाकांचे काम पाहिले तर आपण किती लहान आहोत ते मला जाणवले. अशा लोकांमुळे महाराष्ट्र उभा आहे व देशाला दिशा दाखवणारा राज्य आहे. वृत्तपत्र चालविणे हे सोपे काम नाही . वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ते समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम करत असत असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख यांनी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले.