कर्नाटकात उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट

दिल्ली: वृत्तसंस्था

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बहुमातापासून दूर असताना देखील काल भाजपकडून येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या विरोधात काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता. सुप्रीम कोर्टाने काँग्रेस पक्षाच्या बाजूने समाधानकारक निर्णय देताना. भाजपला उद्या दुपारी चार वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप कडे १०४ आमदार असताना. राज्यपाल विजुभाई वाला यांनी काल सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले.त्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली.त्यावर सुप्रीम कोर्टाने उद्या दुपारी चार वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे भाजप काँग्रेस आणि जेडीएस च्या आमदारांना फोडण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

संबंधित घडामोडी:

कर्नाटकात काँग्रेस,जेडीयुची खरी परिक्षा
येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटक : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे २८ तास
कर्नाटक : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार
सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ
कुमारस्वामी होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान