Covid Update : तुमचे शहर होऊ शकते कंटेन्मेंट झोन? येथे वाचा MHA साठी नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शुक्रवारी आदेश दिला की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोविड-19ची प्रकरणे जास्त आहेत, तिथे व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक कंटेन्मेंट झोन बनवण्यासारखे उपाय केले जावेत. गृह मंत्रालयाने वाढणारी महामारी पहाता मे महिन्यासाठी जारी नवीन दिशा-निर्देशात देशात कुठेही लॉकडाऊन लावण्याबाबत काहीही नमूद केलेले नाही.

यामध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना म्हटले आहे की, ते जिल्हे ठरवा जिथे कोविड-19 संसर्गाचा दर दहा टक्केपेक्षा जास्त आहे किंवा जिथे मागील एक आठवड्यात बेड भरण्याचा दर 60 टक्केपेक्षा जास्त आहे. गृह मंत्रालयाने म्हटले की, यापैकी कोणतेही एक मानक पूर्ण करणार्‍या जिल्ह्याला स्थानिक कंटेन्मेंट झोन बनवण्याच्या उपायांसाठी विचार केला जाऊ शकतो.

एमओएचएफडब्ल्यूचा सल्ला सुद्धा आदेशात जोडला
गृह मंत्रालयाच्या आदेशासह सामुदायिक कंटेंन्मेंट झोन आणि मोठे कंटेन्मेंट झोन सारखे परिसर बनवण्याची रूपरेषा लागू करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा सल्ला सुद्धा यामध्ये जोडण्यात आला आहे. वक्तव्यात म्हटले आहे की, कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय दिशानिर्देश संपूर्ण देशात कठोरपणे लागू राहतील. गृह मंत्रालयाचा आदेश 31 मेपर्यंत प्रभावी राहील.

गृह मंत्रालयाचे दिशा-निर्देश
* महामारीच्या सध्याच्या लाटेला तोंड देण्यासाठी व्हायरसचा प्रसार रोखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
* ज्या क्षेत्रांमध्ये संसर्गाची प्रकरणे जास्त आहेत, अशा ठिकाणी आवश्यक सेवा सोडून रात्रीच्या वेळी लोकांच्या वाहतुकीवर पूर्ण प्रतिबंध राहील.
* सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी कार्यक्रमांमध्ये गर्दी जमवण्यास बंदी असेल.
* विवाह सोहळ्यात कमाल 50 लोक आणि अंत्यसंस्कारासाठी 20 लोक उपस्थित राहू शकतात.
* सार्वजनिक परिवहन आपल्या 50 टक्के क्षमतेसह संचालीत केले जाईल.
* गृह मंत्रालयाने राज्यांना आरोग्य संरचनेचा आढावा करण्यास सुद्ध सांगितले जणेकरून सध्या आणि आगामी काळात (पुढील महिन्यात) संसर्गाच्या प्रकरणांचे व्यवस्थापन करता येईल.
* तसेच रूग्णांना आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात बेड, ऑक्सीजन, आयसीयू बेड, अ‍ॅम्ब्युलन्स आणि व्हेंटिलेटर सारख्या सुविधा पुरवता येऊ शकतात.