Homeताज्या बातम्यातुम्ही फेसबुक वापरता ? ही काळजी नक्की घ्या 

तुम्ही फेसबुक वापरता ? ही काळजी नक्की घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी जगभरात  सर्वाधिक वापरले जाणारे सोशल माध्यम म्हणजे फेसबुक आणि  व्हॉट्स अॅप . पण फेसबुक वरील युजर्स चा डेटा चोरल्या गेल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. आधी केम्ब्रिज अॅनालिटिकाचा वाद झाला आणि आता पाच कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचीही घटना नुकतीच घडली. काही युजर्सच्या तक्रारी आहेत की त्यांच्या नावाची बनावट प्रोफाइल बनवून त्याद्वारे मित्र, नातेवाईकांकडून पैसे मागितले जात आहेत. यापूर्वीही फेसबुकवर अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार घडला आहे. [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b0577b8-c897-11e8-8007-2fc068a24d24′]
मास्टर शेफ ऑफ इंडिया शोचे होस्ट आणि मॅसिव्ह रेस्टॉरंटचे संस्थापक झोरावर कालरा यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकत माहिती दिलीय की हॅकर्सनी त्यांचं फेक अकाऊंट बनवून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागितले. आणखीही काही युजर्सची तक्रार आहे की फेसबुकवरून त्यांच्या व्हॉट्स अॅपवर नोटिफिकेशन पाठवून त्यांना त्यांचा प्रोफाईल पासवर्ड चेंज करण्यासंदर्भातला मेसेज आला. अशा प्रकारे हॅक केलेल्या अकाउंटमधून मेसेज पाठवून पैसे मागवले जातात.
अशी घ्या  खबरदारी 
  • जर तुम्हाला कोणत्या मित्राकडून पैसे मागणारा मेसेज आला, तर आधी त्या मित्राशी बोलून खातरजमा करा.
  • तुम्ही १० वर्षांनंतर कसे दिसाल, तुमच्या चेहऱ्याचं एखाद्या अभिनेत्रीशी साम्य आहे वगैरै मेसेज आणि लिंक आली तर क्लिक करून नका.
  • एखाद्या लिंकवर जा आणि अमुक गोष्ट फ्री मिळवा असा मेसेज व्हॉट्सअॅपवर आला तर बळी पडू नका.
  • फेसबुक अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही कोणकोणत्या अॅप्स आणि वेबसाईट्सला परवानगी दिलीय ते पाहा. तो पर्याय डिसेबल करा जेणेकरून कोणतीही त्रयस्थ पार्टी तुमचं खातं अॅक्सेस करणार नाही.
  • कोणतंही नवं अॅप डाऊनलोड केल्यावर ‘लॉग इन विथ फेसबुक’ हा पर्याय येतो. तो कधीही स्वीकारू नका.
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News