‘रक्त घ्या पण पाणी द्या’ ! पाण्यासाठी मंत्रालयावर 2 युवकांचा ‘मोर्चा’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे)- भिमा नदीचे पाणी एकररूख सिंचन योजने अंतर्गत संपूर्ण अक्कलकोट तालुक्याला कायमस्वरूपी पोहचावे. या मुख्य मागणीसह आणखी इतरही मागण्या घेवुन मौजे करजगी, ता.अक्कलकोट येथिल दोन युवक मंगळूर ते मुंबई मंत्रालय असा पायी प्रवास करत, हातात तिरंगा झेंडा घेवुन, रक्त घ्या पण पाणी द्या..अशा मागणीचा फलक हातात घेवुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेण्यासाठी व त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी पायी पदयात्रेद्वारे निघाले असुन ही यात्रा इंदापूर येथे पोहचताच इंदापूर तालुका प्रहार संघटना व समस्त इंदापूरकरांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.

किरण गवंडी आणी त्याचा साथिदार महेश कचरे यांनी मंगळूर ता. अक्कलकोट येथुन शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर जाण्यासाठी पायी पदयात्रेद्वारे मंगळूर तालुका अक्कलकोट येथुन प्रयाण केले असुन त्यांचे इंदापूर येथे नुकतेच आगमन झाले.यावेळी त्यांचेशी बातचित केली असता ते म्हणाले की अक्कलकोट तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी राहीला असुन या तालुक्यातील सर्व नदी-नाले,तलाव कोरडे ठक पडलेले आहेत.शेतकर्‍यांचे या वर्षिचे खरिप पिक संपूर्ण वाया गेले आहे.शिवाय नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा व चार्‍याचा प्रश्न गंभिर बनला आहे.परंतु सरकार मात्र सुन्न का आहे ? गेल्या दहा वर्षापासुन वर्षागणीक अक्कलकोट तालुक्यात पाऊस कमी होत असल्याने तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे.

आनेक वर्षापासुन रखडलेल्या एकरूख सिंचन योजना प्रकल्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,याबरोबरच उजणी धरणातुन भिमा नदीद्वारे अक्कलकोटच्या टेलएंन्डला पाणी सोडावे,शेतकर्‍यांच्या मालाला हमिभाव मिळावा,वाढलेली बेरोजगारी व ग्रामिण भागातून होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध व्हावेत.इत्यादी मागण्या घेवुन वरील दोन युवक पायी पदयात्रेद्वारे प्रवास करत मागण्यांचे निवेदन घेवुन ते मुंबइत मुख्यमंत्र्याना भेटणार असुन आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची माहीती इंदापूर येथे बोलताना दीली.यावेळी प्रहार संघटनेचे राजाभाऊ लोंढे, अमोल मिसाळ, रमेश शिंदे,सतीश सागर, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like