47 ची मंदिरा आणि 53 ची सलमा, मात्र 25 च्या वाटतात या अभिनेत्री, जाणून घ्या त्यांचे ‘रुटीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वय वाढू लागल्यावर अनेक महिला आपल्या तब्बेतीची काळजी घेणे बंद करतात. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. मात्र एखाद्या महिलेने ठरवले की आपल्याला फिट रहायचे आहे तर तीला कोणी अडवू शकणार नाही याचेच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री मंदिरा बेदी आणि सलमा हायक ने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. जाणून घेऊयात या दोनीही सेलिब्रेटीची लाइफ स्टाइल नेमकी कशी आहे.

मंदिरा बेदी या रोज नियमित आपले वर्कआउट फॉलो करतात त्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. मंदिरा म्हणते की आठवड्यातील पाच ते सहा दिवस नियमित पणे जिममध्ये जाऊन व्यायाम करते.


प्रवासात असतानाही बदलत नाही रुटीन
मंदिरा सांगते की जेव्हा ती प्रवास करत असते तेव्हाही आपलं रोजच रुटीन सोडत नाही आणि व्यायाम सुरु ठेवते. एवढेच नाही तर घरी काही काम नसेल तेव्हा मंदिरा आपला वेळ व्यायामासाठी देते. तसेच एखाद्या जवळ ठिकाणी जाताना पायी चालत जाते. मंदिरा दिवसातून कमीत कमी 15000 पावले चालते. आणि हे रुटीन रोज पाळण्याचा प्रयत्न करते.

View this post on Instagram

#Monarca @hola_mx

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek) on


पोषक आहार
एका मुलीची आई असूनसुद्धा मंदिरा सध्या 20 – 25 वय असलेल्या मुलीप्रमाणे तरुण वाटते, मंदिरा नेहमीच चांगले आणि घरी बनवलेला आहार घेते.मंदिराच्या मते प्रत्येक व्यक्तीला ठाऊक असणे गरजेचे आहे की त्यांच्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट.मंदिरा आपल्या आहारात बटाट्या सारखे जड पदार्थ खाणे टाळते आणि एखाद्या दिवशी चीझचे जास्त पदार्थ खाल्ले तर दुसऱ्या दिवशी जिममध्ये त्याची भरपाई करते.

View this post on Instagram

#happyplace #maldives

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on


पळण्याची आवड
मंदिराला रनिंग करणे खूप आवडते त्यामुळे मंदिरा रोज अर्धा तास जॉगिंग करते आणि व्यायामासोबतच अनेकांना धावण्याचा सल्लाही देते.वजन वाढलेले असेल तर रनिंग करणे खूप कठीण असते मात्र प्रयत्न केल्याने हळू हळू सवय होते असं मदिरा सांगते.

View this post on Instagram

❤️

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on


सलमा हायक सुद्धा घेते काळजी
सलमा हायक ही हॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, काही दिवसांपूर्वीच सलमाने आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. वय वर्ष पन्नास ओलांडल्यानंतरही सलमा एकदम फिट वाटते.


सिंपल रुटीन फॉलो करते सलमा
फिट आणि निरोगी राहण्यासाठी सलमा एकदम सिंपल रुटीन फॉलो करते मात्र रुटीन जरी साधे असले तरी नियमित आणि काटेकोर पद्धतीने सलमा त्याच पालन करते.


डायटिंगची आवड नाही
सलमाला डायटिंग करायला अजिबात आवडत नाही. डायटिंग ऐवजी सलमा हेवी वर्कआउट करायला प्राधान्य देते. हाय प्रोटीन डायटची शौकीन सलमा आठवड्यातून तीन वेळा दणकून नॉनवेज खाते. सलमा खूप पाणी पिते आणि रोज एक तास तरी उन्हात फिरते.


फ्रुट ज्यूसची शौकीन आहे सलमा
सलमाला वेगवेगळ्या अनेक फळांचा ज्यूस प्यायला खूप आवडते, त्यामुळेच सलमाने स्वतःचा एक फ्रुट ज्यूस ब्रँड सुरु केलेला आहे. निरोगी राहण्यासाठी सलमा योगा प्राणायाम सुद्धा करते शरीरासोबत सलमा आपल्या स्कीनची देखील काळजी घेते.

View this post on Instagram

#happysaturday #felizsabado

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek) on

Visit : Policenama.com

You might also like