Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसपासून बचावासाठी उघड्या ठेवा ‘खिडक्या’, जाणून घ्या ‘या’ 8 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत, लोक घाबरलेले आहेत. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. चीननंतर इराण, हाँगकाँग, जपान, इटलीसह अनेक देशांवर कोरोनाने आपली पकड मजबूत केल्यानंतर आता त्याने भारतात शिरकाव केला आहे. या जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत सुमारे 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 90 हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

भारतात प्रथम 3 लोकांना संसर्ग झाल्याचे वृत्त होते, आता 90 लोकांना संसर्ग झाल्याचे म्हटले जात आहे. बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी म्हटले आहे की, कोविड-19 बाबत देशात अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण सापडले आहेत, हे रूग्ण देखरेखीखाली आहेत. कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारण यावर कोणत्याही देशाकडे अजून उपचार उपलब्ध नाही. यामुळे जागतिक ओराग्य संघटनेने आणि इतर संशोधन संघटनांनी बचावासाठी काही खास सेफ्टी टिप्स सांगितल्या आहेत.

नियमित हात धुवा
दिवसभरात अनेकवेळा हात साबणाने किमान 20 सेकंद धुवा. साबण नसेल तर अल्कोहलयुक्त सॅनिटायजरचा वापर करा.

दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, जर आपण दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवून ताज्या हवेत श्वास घेतला, तर यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. सिंगापुरमध्ये चीफ हेल्थ सायंटीस्ट चोर्थ चुहान यांनी म्हटले आहे की, ताज्या हवेत कोरोना व्हायरस पसरू शकत नाहीत. प्रयत्न करा की, घराचे दरवाजे खिडक्या उघड्या राहतील.

खोली उबदार ठेवा
खोली गरम ठेवा. म्हणजे तापमान 30 डिग्री सेल्सियसच्या ठेवावे. एसीबीआयनुसार, खोलीचे तापमान गरम ठेवल्यास या व्हायरसचा धोका कमी होतो. याशिवाय वैज्ञानिकांनी सुद्धा म्हटले आहे की, उन्हाळा आल्यानंतर हे संक्रमण खुप होऊ शकते.

योग्य अंतर ठेवा
आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवा, विशेष करून ज्या लोकांना खोकला, सर्दी असेल त्यांच्यापासून लांब राहा. हात मिळवणे, आणि गळाभेट घेणे टाळा.

नाक, तोंड आणि डोळ्यांना सारखा स्पर्श करू नका
नाक, तोंड आणि डोळ्यांना सतत स्पर्श केल्यास त्यांना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. हे व्हायरस येथून शरीरात प्रवेश करू शकतात.

शिंकताना टिशूचा वापर करा
शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर टिशू धरा. नंतर हा टिशू डस्टबीनमध्ये टाकून द्या.

ताप, खोकला, सर्दी याकडे दुर्लक्ष नको
जर तुम्हाला खोकला, सर्दी, ताप असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. घरातच राहण्याचा प्रयत्न करा.

मोबाईलची स्क्रीन स्वच्छ ठेवा
आपल्या सोबत चोवीस तास राहणार्‍या आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन व्हायरसचा मोठा अड्डा आहे. स्क्रीनवर मेथिसिलिन रसिस्टेंट स्टेफाय्लोकोक्स ऑरीयास नावाचे जीवाणू असतात. स्मार्टफोन आठवड्यातून एकदा डिसइन्फेटींग वाईप्सने स्वच्छ करा. वाईप्स फोनच्या वरच्या भागातील सर्व किटाणूंना नष्ट करते.