संगणक अभियंता तरुणीचा अंघोळ करतानाचा काढला व्हिडीओ

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन – संगणक अभियंता असलेल्या तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढल्याची घटना नुकतीच हिंजवडीमध्ये घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भुजंग नारायण मगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित तरुणी ही मुळची भोपाळची असून ती हिंजवडी मधील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते. तर आरोपी मगर हा कामगार आहे. तरुणी राहत असलेल्या घराच्या बाथरुमच्या खिडकीचे काम आरोपी करत होता. तरुणी आंघोळ करत असताना मगर याने तीचा व्हिडीओ काढला. आरोपी व्हिडीओ काढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हिजवडी पोलिसांनी भुजंग मगर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालनयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीनंतर आरोपीची जामिनावर सुटका झाली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या करत आहेत.

लसिथ मलिंगाच्या पत्नीचे ‘या’ क्रिकेटपटूवर गंभीर आरोप