‘…तो शायद हिंदुस्तान का इतिहास कुछ और होता’, ‘तख्त’चा टीजर रिलीज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करण जोहर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘तख्त सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रणवीर सिंगनं सिनेमाचा टीजर सोशलवर शेअर केला आहे. व्हिडीओत एक सोनेरी शाही सिंहासन दिसत आहे. बॅकग्राऊंडला विकी कौशल आणि रणवीर सिंगचा व्हॉईस ओव्हरही आहे. टीजरमधील रणवीर सिंगच्या आवाजातील संवाद विशेष लक्ष वेधून घेतो.

रणवीर सिंग म्हणतो, “मुगल शहजादों के लिए तख्त का रास्ता मोहब्बत से होकर जाता… तो शायद हिंदुस्तान का इतिहास कुछ और होता” सिनेमाचा टीजर लहान असला तरी खूप दमदार आहे. व्हिडीओ शेअर करताना रणवीर सिंग म्हणतो, “सादर आहे तख्त ज्याच दिगदर्शन करत आहे करण जोहर. निर्माता आहेत हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता.”

https://www.instagram.com/p/B8BbzgXBdUQ/?utm_source=ig_embed

कशी असेल स्टार कास्ट ?
जेव्हापासून तख्त सिनेमाची घोषणा झाली आहे तेव्हापासून सिनेमाची चर्चा सुरू झाली आहे. या बिग बजेट मल्टी स्टारर सिनेमात रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 24 डिसेंबर 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

करण जोहर दीर्घकाळानंतर करणार दिग्दर्शन
बॉलिवूडचा दिग्गज फिल्म निर्माता करण जोहर दीर्घकाळानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहरनं गेल्यावेळी ऐ दिल है मुश्कीलचं दिग्दर्शन केलं होतं. 2016 मध्ये हा सिनेमा आला होता. यानंतर त्यानं लस्ट स्टोरीजमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यात त्यानं एक लहान हिस्सा डायरेक्ट केला होता. त्यामुळे दीर्घकाळानंतर करण पूर्ण सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.