3 हजाराची लाच घेताना वाहतुक पोलिस एसीबीच्या जाळयात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

लाकडाची वाहतुक करणार्‍या टेम्पोवर कारवाई न करण्यासाठी 3 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मिरज वाहतुक शाखेतील पोलिसाला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. मिरजेतील बसस्थानक परिसरात एसीबीने सापळा रचुन ही कारवाई केली आहे. पोलिस आणि त्याच्या मित्राला एसीबीने अटक केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ca75ad6-b5c1-11e8-b23a-fb40aae81bd2′]

वाहतुक शाखेतील पोलिस महेश पोपट कांबळे आणि त्याचा मित्र नंदकुमार संजय सरवदे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 9 सप्टेंबर रोजी तक्रारदाराचा लाकुड वाहतुकीचा टेम्पो पोलिस कर्मचारी महेश कांबळे यांनी अडविला होता. त्यावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी महेश कांबळेने त्यांच्याकडून 2 हजार रूपये घेतले होते. राहिलेली पैसे कांबळे यांनी त्यांचा मित्र सरवरदे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली.

एसीबीच्या पथकाने मिरजेतील बसस्थानक परिसरात सापळयाचे आयोजन केले. सरकारी पंचासमक्ष कांबळे यांचा मित्र सरवदेने तक्रारदाराकडून 3 हजार रूपये घेतले. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस कर्मचारी कांबळे आणि त्यांचा मित्र नंदकुमार सरवदे यांच्याविरूध्द महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’131b6c6f-b5c1-11e8-ad18-315ca7d09376′]

पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर अधिक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक राजेंद्र तेंडुलकर, कर्मचारी अविनाश सागर, जितेंद्र काळे, बाळासाहेब पवार, संग्राम पाटील आणि मयुर देसाई यांनी ही कारवाई केली आहे. वाहतुक पोलिसासह त्याच्या मित्राला एसीबीने लाच प्रकरणी अटक केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी कोणत्याही समितीची स्थापना नाही 

Loading...
You might also like