९ हजारांची लाच घेताना २ पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी बनवून अटक न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

महेश वसंत पवार, (वय वर्षे 47 पोलीस नाईक पुणे रेल्वे पोलीस स्टेशन) व राजेश सुरेश शिर्के (वय वर्षे 41, पोलीस नाईक पुणे रेल्वे पोलीस स्टेशन) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकऱणी ४३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या मुलाविरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करता त्याला अटक न करण्यासाठी पोलीस नाईक महेश पवार व राजेश शिर्के यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकऱणी तक्रारदाराने अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी पथकाकडून कऱण्यात आली. त्यावेळी त्यांनी तडजोडीअंती ९ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अँटी करप्शनकडून सापळा रचण्यात आला. तेव्हा राजेश शिर्के याने तक्रारदाराकडून ९ हजारांची लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्याचे काम सुरु आहे.

भरचौकात तलवारीने केक कापणाऱ्या ‘या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला बेड्या
वर्षातील काही दिवस प्रौढ पुरुषांना सेक्स फ्री… महिला कार्यकर्त्याची राहुल गांधींवर चिरफाड टीका
पोलिसांनी पैसे घेऊन माझ्या तडीपारीचा प्रस्ताव