पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘ते’ दोन लाचखोर हवालदार निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे ग्रामीण पोलीस दलातील जुन्नर आणि पौड पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदरांना आज (शनिवार) करण्यात आले. तसेच त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्नर पोलीस ठाण्यातील तनश्री लक्ष्मण घोडे (42, बक्‍कल नं. 1624, पुणे ग्रामीण) आणि पौड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार तात्यासाहेब रामचंद्र आगवणे (48, बक्कल नं. १६२४ रा. स्वारगेट पोलिस लाईन) असे निलंबीत करण्यात आलेल्या दोन पोलीस हवालदरांची नावे आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश आज संध्याकाळी देण्यात आले.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce299fbb-b8f6-11e8-9d35-a9a7f3ab77d6′]

पुणे ग्रामीण पोलिस दलातील जुन्‍नर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदारतनश्री लक्ष्मण घोडे यांना पुणे विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 2 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई सोमवारी (दि.१०) झाली होती.

महिला पोलिस हवालदार तनश्री लक्ष्मण घोडे  यांनी तक्रारदार यांच्या भाच्यावर दाखल असलेल्या गुन्हयात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे 2 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली. एसीबीच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस हवालदार तनश्री घोडे या लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. दि. 2 जुलै रोजी एसीबीच्या अधिकार्‍यांनी लाच प्रकरणाची पडताळणी केली होती. एसीबीचे अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हिवरकर आणि त्यांच्या पथकाने सापळयाचे आयोजन केले असता सरकारी पंचासमक्ष महिला पोलिस हवालदार तनश्री घोडे यांनी 2 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. महिला पोलिस हवालदाराने 2 हजाराची लाच स्विकारल्यामुळे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली होती.
[amazon_link asins=’B01FXJI1OY,B01DF29XFW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d330db07-b8f6-11e8-bf48-1328fe6e4788′]

ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार तात्यासाहेब रामचंद्र आगवणे यांना 3 हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई बुधवारी (दि.१२) झाली होती.

तात्यासाहेब रामचंद्र आगवणे यांनी तक्रारदार युवकाविरूध्द अदखलपात्र गुन्हयाची (एनसी मॅटर) नोंद आहे. त्या अदखलपात्र गुन्हयात कारवाई न करण्याकरिता पोलिस हवालदार आगवणे यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. दि. 8 सप्टेंबर रोजी एसीबीच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पडताळणीत आगवणे हे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. तडजोडीअंती त्यांनी 3 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळयाचे आयोजन करुन सरकारी पंचासमक्ष पोलिस हवालदार तात्यासाहेब आगवणे यांनी तक्रारदार युवकाकडून 3 हजार रूपयाची लाच स्विकारली. आगवणे यांना 3 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B076HSBF11′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2d6bf5a-b8f6-11e8-bdf0-e7e587b54cb4′]

या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन आज पासून शासकिय सेवेतून तात्काळ निलंबीत केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश आज सायंकाळी देण्यात आले आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी