25 हजाराची लाच घेताना हातकणंगले तालुक्यातील तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

हातकणंगले : पोलीसनाना ऑनलाईन – माती उत्खननासाठी अधिकृत परवाना देण्याकरिता 25 हजाराची लाच घेताना इंगळी (ता.हातकणंगले) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

संतोष सुभाष उपाध्ये (रा.केडीसी बँके समोर कुरुंदवाड, ता. शिरोळ) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंगळी येथील एका व्यक्तीला विटभट्टीसाठी माती उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी भरून परवाना पाहिजे होता. यासाठी तलाठी उपाध्ये यांच्याकडे गेल्यानंतर त्याने अधिकृत परवाना देण्यासाठी 30 हजाराची मागणी केली. तडजोडीनंतर 25 हजार रुपयांवर तोडगा निघाला. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. लाचलुचपतच्या पथकाने 24 मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास इचलकरंजी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाबाहेर सापळा रचून तलाठी उपाध्ये याला तक्रारदार यांच्याकडून 25 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक पोलीस निरिक्षक बंबरगेकर, पोलिस नाईक सुनिल घोसाळकर, पोलिस नाईक कृष्णात पाटील आदीच्या पथकाने ही कारवाई केली.