तलाठी, लिपिक ३ हजाराची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – जमिनीचे फेरफार कागदपत्रे देण्यासाठी तलाठ्याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. तलाठ्याच्या वतीने लाच स्विकारताना लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) तहसील कार्यालयात दुपारी करण्यात आली.

तलाठी शंकर साळवी (वय-३८) आणि लिपिक नितीन पाटील (वय-३५) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एका शेतकऱ्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या रुंदे तालुका कल्याण येथील जमिनीचे फेरफारचे कागदपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर कागदपत्रे तक्रारदार यांना पुरविण्यासाठी साळवीने तीन हजाराची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी, तक्रारदारकडून साळवी याच्यावतीने तीन हजारांची लाच स्वीकारताना पाटील याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

तृतीयपंथ्याकडून (देवदासी) २५ हजारांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
राज्यातील ३ अतिवरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या