अपघातात तलाठ्याचा मृत्यू

कडाः पोलीसनामा ऑनलाईन – कामावरून रात्री घराकडे असताना दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एका तलाठ्याचा मृत्यू झाला. बीड नगर रोडवर कडा येथे शुक्रवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोपट नारायण गोरे असे मयत झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील पोपट गोरे हे पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे कार्यरत होते. शुक्रवारी काम उरकुन ते कड्यात आले. कड्यात आल्यावर घरगुती काम उरकताना उशीर झाला. रात्री नऊच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीवरून ( MH 16, BH 5758 ) घराकडे निघाले होते. त्यावेळी एका तीव्र वळणावर येताना त्यांचा अचानक ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.