600 रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विहिरीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी 600 रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) करण्यात आली. गणेश शिंदे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. गणेश शिंदे हा करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव आणि कोगील बुद्रुकचा तलाठी आहे.

तक्रारदार यांची दऱ्याचे वडगाव येथे वडिलोपार्जीत शेती आहे. त्यांनी जवाहर अनुदान योजने अंतर्गत तक्रारदाराने विहीर खोदली आहे. या विहिरीची नोंद हस्तलिखीत सातबाऱ्यावर घेतली आहे. मात्र, ऑनलाईन सातबाऱ्यावर त्याची नोंद करण्यात आलेली नाही. या नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी गणेश शिंदे याची वेळोवेळी भेट घेऊन ऑनलाइन नंदीसाठी अर्ज देण्यात आलेल्या अर्जाबाबत विचारणा केली.
मात्र काही आवश्यकता नाही असे त्याने तक्रारदाराला सांगितले. शनिवारी (दि.७) गणेश शिंदे याची भेट घेतली त्यावेळी त्याने तक्रारदाराकडे नोंदणीसाठी 600 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने आज तलाठी गणेश शिंदे याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, पोलीस नाईक शरद कोरे, नवनाथ कदम, हवलदार मयुर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Loading...
You might also like