छ.संभाजीनगर: Talathi Recruitment Exam Scam | स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी भेटावी अशी सगळ्यांची इच्छा असते. अशातच राज्यात अनके परीक्षांचे घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी तणावात आहेत. मागेच तलाठी परीक्षेचा घोटाळा समोर आला होता.
त्यावरून विविध पक्ष संघटनांकडून आवाजही उठवण्यात आला. पण या परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आता मात्र तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माईंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दत्ता नलावडेला (Datta Nalawade) छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र अखेर आता त्याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड दत्ता कडूबा नलावडे (२७, रा. भालगाव) हा तब्बल नऊ महिन्यांनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती लागला आहे.
शनिवारी सकाळी मिलकॉर्नर परिसरात निवांत फिरताना आढळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
सप्टेंबरमध्ये शहरात तलाठी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले.
तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंगारा देत होता.
मात्र, आता अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Talathi Recruitment Exam Scam)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Katraj Chowk Accident News | कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू