Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Recruitment In Revenue Department Maharashtra | महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या 4 हजार 122 पदांसाठी भरती होणार आहे. यात रिक्त 1 हजार 12 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 3 हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून, येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश राज्याचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते (Shreekant Mohite) यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

महसूल विभागांसाठी असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लवकरच भरती घेण्याचे निर्देश महसूल विभागामार्फत दिले गेले आहेत. तलाठी नसल्याने ग्रामपंचायतींपासून गावांवर आणि लोकांना मिळणाऱ्या सेवांवर मोठा परिणाम होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्या वतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. त्याला आता शासनाने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच 4122 पदे भरण्यात येणार आहेत. (Recruitment In Revenue Department Maharashtra)

राज्यातील महसूल विभागातील नाशिक विभागात 1035, औरंगाबाद विभागात 847, कोकण विभागात 731,
नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183, तर पुणे विभागात 746 अशा एकूण 4122 पदांची
भरती लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून
त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशील जिल्हानिहाय मागविण्यात आला आहे.

Web Title :- Talathi Recruitment In Revenue Department Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sidhu MooseWala Murder Case | सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात