धक्कादायक ! 10 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची मैत्रिणीच्या घरी आत्महत्या

पोलीासनामा ऑनलाइन टीम – अवघ्या १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने मैत्रिणीच्या घरी छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवार (दि.२८) दुपारी तीन वाजून 20 मिनिटांनी वराळे येथील भीमाशंकर कॉलनी उघडकीस आली.

संजना दीपक लोखंडे (वय 19, रा. भीमाशंकर कॉलनी वराळे ता.मावळ) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजनाचे आठ दिवसांपूर्वी गायकवाड यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती कोणाला काही न सांगता निघून जाऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली होती. तिचा शोध घरचे घेत होते.
शनिवार (दि.२८) रोजी तिने तिच्या मैत्रिणीच्या घरी छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. याप्रकरणी संजना लोखंडे हिचा मामेभाऊ अक्षय रणपिसे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात खबर दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक उंडे, उपनिरीक्षक राहुल कोळी यांनी धाव घेतली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like