ADV

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातून चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Talegaon Dabhade Pimpri Crime News | तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने शनिवारी (दि.22) केली आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch)

ओमकार उर्फ बंटी दत्ता आसवले (वय 20 रा. टाकवे मावळ), समर्थ संभाजी तोरणे (वय 19 रा. कात्रज तलावाजवळ, कात्रज) व अमन मेहबूब शेख (वय 19 रा. काकडे वस्ती, कोंढवा) अशी अटक आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई शुभम तानाजी कदम (वय-28) व रामदास कुंडलिक मोहिते (वय-37) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आसवले हा जुन्या पुणे-मुंबई हायवेजवळ निलया नाईकनवरे सोसायटी समोर थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आसवले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक पिस्टल व दोन जीवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला अटक केली.

दुसरी कारवाई तपोधाम क़ॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ केली. वराळे कडे जाणाऱ्या रोडवर पथकाने समर्थ तोरणे व अमन शेख यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता तीन देशी बनावटीची पिस्तुले व चार जीवंत काडतुसे एसा एकूण 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना